Power Of Hindus God

Power Of Hindus God
Power Of Hindus God

Thursday, February 24, 2011

मुलांनो, जेवणासंबंधी या सूचनांचे पालन करा !

मुलांनो, जेवणासंबंधी या सूचनांचे पालन करा !


१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.


वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरिचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

५. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना -

`हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे.
या प्रसादातून मला शक्‍ती व चैतन्य मिळू दे.\'
६. अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा.७. एकमेकांचे उष्टे अन्न खाल्ल्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो; म्हणून उष्टे अन्न खाऊ नका.
८. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवणानंतर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचला.
[ref : www.balsanskar.com]

प्रातःस्मरण, मङ्गलाचरण, करदर्शन व भूमिवंदन

सूर्योदयापूर्वी उठून शौच-मुखमार्जन करुन शुद्ध मनाने देवाचे स्मरण करावे॰ प्रभातकाली वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता असते॰या मुहूर्तावर उठून रोजच्या कामाची सुरुवात प्रभुस्मरणाने केली असता आत्मबल वाढते॰ वाईट विचार मनात येत नाहीत एकाग्रता उत्पन्न होते आणि या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आरोग्य प्राप्त होते

श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः
श्रीवेदपुरुषाय नमः इष्टदेवताभ्यो नमः
कुलदेवताभ्यो नमः श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः
श्रीउमामहेश्वराभ्यां नमः श्रीमातापितृभ्यां नमः
करदर्शन भूमिवंदन
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ॥१॥
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥२॥

(
मुखमार्जनानंतर)
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्गयते गिरिम
यत्कृपा तमहं वंदे परमानन्दमाधवम्
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि॥
भोजनाच्या वेळचे श्लोक
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥
जनीं भोजनी नाम वाचे वदावे
अती आदरे गद्यघोषे म्हणावे
हरिचिंतने अन्न सेवित जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥
जयजय रघुवीर समर्थ

संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळची प्रार्थना


शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥१॥
दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडले मोतीहार
दिव्याला देखून नमस्कार ॥२॥
तिळाचे तेल कापसाची वात
दिवा जळो मध्यान्हरात
दिवा लागला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ॥३॥
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥४॥

सूर्यनमस्कार

प्रातःकाळीं शौच मुखमार्जन स्नान करुन नंतर सूर्याच्या कोंवळ्या किरणात नमस्कारदेवता श्रीसूर्यनारायण त्याला भक्तिपूर्वक वंदन करुन रोज नियमित साष्टांग नमस्कार घातल्याने आपादमस्तक सर्व शरीरात एकसारखी उष्णता उत्पन्न होऊन आरोग्यास आवश्यक असलेले रुधिराभिसरण जोराने सुरु होते. नाड्या नाड्यातला मळ हा रुधिराभिसरणाने घामाच्या रुपाने बाहेर फेकला जाउन शरीर हलके चपळ बनते सर्व अवयव प्रमाणबद्ध पुष्ट होतात जठराग्नि प्रदिप्त होऊन अन्नपचन चांगले होऊ लागते.

ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसंनिविष्टः
केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्यमयवपुर्धृतशंखचक्रः
सूर्याची बारा नावे
मित्राय नमः
रवये नमः
सूर्याय नमः
भानवे नमः
खगाय नमः
पूष्णे नमः
हिरण्यगर्भाय नमः
मरिचये नमः
आदित्याय नमः
सवित्रे नमः
अर्काय नमः
भास्कराय नमः
श्रीसवितृसूर्यनारायणाय नमः
मित्ररविसूर्यभानुखगपूषहिरण्यगर्भमरीच्यादित्यसवित्रर्कभास्करेभ्यो नमो नमः
नमस्कार घालून झाल्यावर खालील श्लोक म्हणावे ीर्थ घ्यावे
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ॥१॥
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम्
सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥२॥
अनेन नमस्काराख्येन कर्मणा श्रीसवितृसूर्यनारायणः प्रीयताम्

स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक


गङ्गे यमुने चैव गोदावरि सरस्वती
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं करु
नमामि गङ्गे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरुपम्
भुक्तिं मुक्तिं ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम
गङ्गा गङ्गेति यो ब्रुयात् योजनानां शतैरपि
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं गच्छति
गङ्गाद्वारे कुशावर्ते बिल्वके नीलपर्वते
स्नात्वा कनखले तीर्थे पुनर्जन्म विद्यते
पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभवः
त्राहि मां कृपया गङ्गे सर्वपापहरा भव
[ref: www.balsanskar.com]