Power Of Hindus God

Power Of Hindus God
Power Of Hindus God

Monday, November 1, 2010

जपमाळ कशी सावी ?
 

१) रूद्राक्ष (मनोरथ पूर्ण करणारे) पोवळे ( विपुल संपत्ती प्रद) स्फटिक (सौभाग्यप्रद) अशी असावी.
२) प्रत्येक मणि तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुफलेले असावेत.
३) मणि फार बारीक अथवा मोथे नसावेत.
४) प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा.
५) सर्व सामान्य जपमाळेत १०८ मणि असतात. मध्यभागी मोठा मणि ( मेरूमणी ) असातो.
६) प्रतिदिन जपाच्या मंत्रांची निश्‍चित संख्या ठरवावी व जप करावा.
७) जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी.
८) जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा. जपमाळ लोकांना दिसू नये.
९) माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणि सहज सरकवता येतील असे असावेत.
१०) माळ तुटली फुटली नसावी.
११) मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणि सरकवावेत. सवयीने ते अंगवळणी पडते.
१२) माळेत १०८ मणि असले तरी ती संख्या १०० धरावी.
१३) मेरुमण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरुमणि उल्लंघू नये. माळेचा तो १०९ वा मणि असतो.
१४) जप झाल्यावर माळ पोथित अथवा पांढर्‍या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये.
१५) पुढे पुरश्‍चरण करावे।

(प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित' )

Sunday, October 31, 2010

फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा....


 फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा....

 दिवाळीत फटाक्यांवर श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीराम या देवतांची तसेच थोर क्रांतीकारक देशभक्त सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रपुरुषांची चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यावर या चित्रांच्या चिंडध्या होऊन त्या पायदळी तुडवल्या जातात, रस्त्यावर किंवा गटारात  पडलेल्या आढळतात. एकीकडे आपण लक्ष्मी देवीची पुजा करतो व दुसरीकडे तिच्या चिंध्या  करतो अशा तर्‍हेने हिंदूंच्या देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना होत असून ते एक प्रकारचे पापच आहे. यासाठी आपण सर्वांनी फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवली पाहिजे.