फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवा....
दिवाळीत फटाक्यांवर श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीराम या देवतांची तसेच थोर क्रांतीकारक देशभक्त सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रपुरुषांची चित्रे छापली जातात. हे फटाके फोडल्यावर या चित्रांच्या चिंडध्या होऊन त्या पायदळी तुडवल्या जातात, रस्त्यावर किंवा गटारात पडलेल्या आढळतात. एकीकडे आपण लक्ष्मी देवीची पुजा करतो व दुसरीकडे तिच्या चिंध्या करतो अशा तर्हेने हिंदूंच्या देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना होत असून ते एक प्रकारचे पापच आहे. यासाठी आपण सर्वांनी फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवली पाहिजे.